इंजिनिअरनं बनवला माईकवाला मास्क

कोची : आजच्या घडीला करोनासोबत जगायला शिका असंच सर्वांकडुन सांगण्यात येतंय. मागील 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून मास्क, सॅनिटायजर आणि सामाजिक अंतर हे आपणास बंधनकारक झालयं. त्यामुळे, मास्क असल्याशिवाय घराबाहेर पडणेही कठीण होतयं. आतातर मास्कचेही विविध प्रकार आपण अनुभवले आहेत. आता, चक्क माईकवाल्या मास्कची निर्मिती एका केरळमधील तरुणाने केली आहे.

थ्रिसर सरकारी अभियांत्रिकी विद्यालयातील बीईच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांना मास्कमुळे बोलताना येणारी अडचण लक्षात घेत माईकवाला मास्क बनवला आहे. विशेषत: डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांना लक्षात घेऊन या मास्कची निर्मित्ती करण्यात आली आहे. केविन जॉकोबचे वडिल डॉक्टर आहेत. स्वत:च्या वडिलांना बोलताना किंवा संवाद साधाताना मास्कमुळे होणारी अडचण लक्षात घेऊन केविने माईक आणि स्पीकरधारित मास्क बनवला आहे.

केविनेन सर्वप्रथम स्वत:च्या आई-वडिलांनाच त्याने हे मास्क वापरण्यास दिले होते. डॉ. सेनोज केसी आणि डॉ. ज्योती मेरी जोस यांनीही मास्क परिधान करुन कंम्फर्ट असल्याचं सांगितलं. त्यामुळे, आता या मास्कच्या मागणीनुसार आपण मास्कची निर्मित्ती करणार असल्याचं केविनने सांगितलंय.

You May Also Like

error: Content is protected !!