मिलिंद सोमणच्या पत्नीने व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण

अंकिताची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…

मुंबई । देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार ही सोशल मीडियावर तिचं मत मांडताना दिसते. नुकतीच अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने ईशान्य भारतातील लोकांना संपूर्ण भारतात कशी वागणूक दिली जाते हे यावर भाष्य केले आहे.

 

 

अंकिताने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. अंकिताने ही पोस्ट मिराबाई चानूने जिंकलेल्या ऑलिम्पिकमध्ये मेडलवरून आहे. “तुम्ही जर ईशान्य भारतातले असाल आणि जर तुम्ही भारतासाठी पदक जिंकलं तरच तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जाऊ शकता. नाही तर आपण सगळे ‘चिंकी’, ‘चीनी’, ‘नेपाळी’ किंवा मग ‘करोनाचा कोणता तरी नवीन प्रकार’ म्हणून ओळखले जातो. भारत फक्त जातिवादच नाही तर वर्णभेदानेही ग्रासलेला आहे. माझ्या अनुभवांवरून बोलते #Hypocrites.” अंकिताने लोकांना ढोंगी म्हणतं हे हॅशटॅग वापरलं आहे. अंकिता ही ईशान्य भारतातील आसाम मधली आहे. अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

You May Also Like