नाशिकमध्ये ऑक्सिजनची किरकोळ गळती : राजेश टोपे

नाशिक  :नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  नाशकातील डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे एप्रिलच्या सुरवातीला ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली आहे. आज याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. यावेळी या टाकीत ऑक्सिजन भरत असताना अचानक ऑक्सिजन लिक झाल्याने सर्वत्र रस्त्यावर पसरला.

रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं असून गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात १३० रुग्ण दाखल असून गळतीनंतर काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

ही घटना इतकी भयंकर होती अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. मात्र, ही घटना छोटी असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोबतच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

या घटनेमध्ये ऑक्सिजनही वाया गेला नसल्याची माहिती, टोपे यांनी दिली आहे. स्थानिक प्रशासनानं याबद्दलची माहिती दिल्याचं टोपे यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like