आमदार पवारांनी ‘झिंगाट’ वर धरला ठेका ; व्हिडिओ व्हायरल

अहमदनगर : गायकरवाडी, कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी करोनाग्रस्त रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून  या डान्सचं अनेकांकडून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाचा स्वतः रोहत पवार यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहीले की, ‘गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो.’

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्ज तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज, सोमवारी भेट दिली. यावेळी करोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढावण्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात रोहित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळाले.

 

You May Also Like