मनसेतर्फे पुण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा; ५० प्रशिक्षित कार्यकर्ते

पुणे ।  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तयारीला लागले आहेत. पुणे-नाशिक दौऱ्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या दौऱ्यात राज ठाकरेंनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

 

राज्यात मनसेची आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकटकाळात मनसेचं आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीसाठी तयार असणार आहे. या आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकात ५० मुला-मुलींचा समावेश असेल. शहरातील पूरस्थिती, इमारता दुर्घटना तसेच नैसर्गिक आपत्तीत मनसेचे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाची मदत करणार आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा करण्यात आली. पुण्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी हे पथक तयार असणार आहे. ५० जणाचे हे पथक अडचणीत असलेल्या पुणेकरांच्या मदतीला धावून येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष आपत्ती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकातील सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

You May Also Like