जावई बापू डोंबिवलीकडे लक्ष द्या, मनसेच्या एकमेव आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डोंबिवलीतील वाढते प्रदूषण, शहराची दुरावस्था आणि त्यासाठी जबाबदार एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच “मला कोणतीही टीका करायची नाही. पण, मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. आता त्यांनी डोंबिवली शहरावर लक्ष द्यावे,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोलाही लगावलाय.

गेल्या २५ वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली शहरात वाढते प्रदूषण, अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, नाले तुंबणे यासाठी हेच अधिकारी जबाबदार आहेत. असा आरोपही राजू पाटील यांनी केला आहे.

“याबाबत आम्ही सतत आंदोलन करत असतो. एमआयडीसीतील प्रदूषण, कधी हिरवा पाऊस पडतो. कधी गॅस लीक होतो. या सर्व गोष्टींचा हिवाळ्यात याचा फार त्रास होतो. याबाबत आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. पण मध्यतंरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही अधिकारी आले होते. त्यांनी याबाबतचा आढावा घेतल्यानंत या ठिकाणी स्वच्छता नाही असे समजले. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना अक्षरश: झापलं. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यात लक्ष द्यावे,” अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

तसेच, “डोंबिवली शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. येथे प्रचंड प्रदूषण आहे. त्यावर तुम्ही तरी लक्ष द्या. या अधिकाऱ्यांवर लक्ष द्या. जर आम्ही गेलो, तर आमच्यावर कलम 353 अंतर्गत तक्रारी होतात. याबाबत आंदोलन किती वेळा करणार त्यालाही मर्यादा असते. मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत, डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे आणि डोंबिवली शहर सुधारावे. कारखानदारांना महानगर गॅस परडवत नसेल तर राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा व त्यांना सवलत (सबसीडी) द्यावी आणि तातडीने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत”, अशीही मागणी आमदार पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठवलेल्या दुसऱ्या पत्राद्वारे केली आहे.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.