मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार

मुंबई । मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्यानंतर राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे मनापासून आभार मानले. डोंबिवलीमधील गांधीनगर नाल्यामध्ये रायबो फार्म या कंपनीकडून केमिकलचे पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे नाल्यातील पाणी विषारी होऊन त्याला हिरवा रंग आला होता. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी येथील कंपन्यांवर कारवाई केली होती.

 

प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई केल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ‘डोंबिवलीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा.’ असे ट्विट मनसे आमदाराने केले आहे.

 

या दरम्यान, गांधीनगर नाल्यातून सांडपाणी हिरव्या रंगाचे होते. हे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या हिरव्याजर्द नाल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची दखल घेतली आणि संबंधित कंपनीवर कारवाईचे निर्देश दिले होते. यानंतर या प्रकरणाला आळा बसला.

You May Also Like