मोदी सरकारचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | खराब हवामान, वेळी-अवेळी पडणारा पाऊस,  निसर्गाची न मिळणारी साथ या सर्व गोष्टींवर मात करतो.  आपल्या शेतात बाजारभावाची किंमत न करता मेहनतीच्या जोरावर चांगलं उत्पादन घेत असतो. याबाबत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

 

 

एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी टोमॅटोच्या प्रश्नावर पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

 

 

राज्यातील शेतकरी सध्या टोमॅटोचे भाव पडल्यामुळे त्रस्त होऊन आक्रमक झाले आहेत. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालात राज्य सरकारला जो काही तोटा होईल, त्या तोट्यात केंद्र सरकारचा 50 टक्के वाटा असेल असं केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आलं आहे. तसेच याबाबतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवावा अशीही त्यांनी राज्याला विनंती केली आहे.

 

You May Also Like