मोदी सरकारचा मोठा निर्णय ; आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात

नवी दिल्ली  : गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू  लागली आहे. या कारणास्तव  रुग्ण संख्या वाढल्याने देशातील लशींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने  मंगळवारी मोठा निर्णय घेतला. ज्या लशींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेने अप्रूव्हल दिले आहे. त्या सर्व लशींना भारतानेही मंजुरी दिली आहे. सरकारने आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे. त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि WHO शी संबंधित आहेत.

लशीला मंजुरी देणाऱ्यांत यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, यूरोपियन मेडिसिन एजन्सी, यूकेएमएचआरए, पीएमडीए जपान आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा समावेश आहे. यापूर्वी सरकारने रशियाच्या स्पुतिनक-V लशीलाही मंजुरी दिली आहे.

तसेच, सरकारने ज्या लशींना परवानगी दिली आहे, त्या लशींची सर्वप्रथम पुढील 7 दिवसांपर्यंत 100 रुग्णांवर टेस्ट केली जाईल. यानंतर देशाच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात येईल. या निर्णयामुळे भारतात लशींची आयात करायला आणि लसीकरण कार्यक्रमात गती आणण्यास मदत मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. तसेच, या निर्णयामुळे, औषध निर्माता कंपन्यांना विदेशी लस भारत तयार करण्याची मंजुरी मिळविणेही सोपे होईल.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

 

You May Also Like