चक्रीवादळ पळवण्याचा मोदी-शाहांचा डाव; संजय राऊत वादळाला अडवणार मुंबईतच

मुंबई : गोवा किनारपट्टीपासून 150 किमी आतमध्ये चक्रीवादळला सुरुवात झाली आहे. याचा मोठा फटका भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला असून आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. मागील काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत.

एकीकडे खराखुरा पाऊस कोसळत असताना, सोशल मीडियावर चक्रीवादळाबाबत हलके फुलके विनोद, चारोळ्या, फोटोज, व्हिडीओज आणि मिम्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. अशातचं जळगावचे भाजप खासदार उमेश पाटील यांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून तौत्के चक्रीवादळावरुन शिवसेनेचं मुख्या प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांना जबरदस्त टोला लगावला आहे. त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, मोदी आणि शाहांचा चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा डाव आहे. पण संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार आहेत. उमेश पाटील यांच्या हा विनोद काल सायंकाळपासूनच सोशल मीडियावर जोरात चर्चेत आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या व्हेरिफाइड अकाऊंटवरुन रावतांना हा टोला लगावला आहे. त्यामुळे हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!