मान्सूनची अंदमानात एन्ट्री..15 जूनपर्यंत महाराष्ट्रात होणार दाखल

मुंबई : भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळ धडकल्यानंतर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वीच हवामान विभागाने 21 मे रोजी अंदमानात मान्सून धडकणार असल्याचं अंदाज वर्तवला होता. त्यामुसार मान्सून वेळेत अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे.

दि.21 जूनला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदामानाच्या काही भागात मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. पुढील 48 तास हा परिणाम दिसून येईल, असेही सांगितले जात आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे. सध्या मान्सूनसाठी वातावरण पोषक आहे. परिणामी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, त्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर 15 ते 20 जूनदरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

You May Also Like