दिलासादायक ! पुण्यात नव्या करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने  हाहाकार माजवला आहे. परंतु या दरम्यान,  एक सराकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या 6 दिवसात शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाबाधिकांच्या संख्येत बरीच घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 16 ते 21 एप्रिल या दरम्यान शहरात सुमारे 27 हजार 694 रुग्ण सापडले असून बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 175 इतकी आहे.

गेल्या 24 तासात 4539 पाझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 387030 असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 51552 इतकी आहे.

बरे होणाऱ्यांची संख्या 

16 एप्रिल – नवीन रुग्ण 5373 – बरे झालेले 5049

17 एप्रिल – नवीन रुग्ण 6006 – बरे झालेले 5609

18 एप्रिल – नवीन रुग्ण 6634 – बरे झालेले 4712

19 एप्रिल – नवीन रुग्ण 4587 – बरे झालेले 6473

20 एप्रिल – नवीन रुग्ण 5138 – बरे झालेले 6802

21 एप्रिल – नवीन रुग्ण 5529 – बरे झालेले 6530

22 एप्रिल – नवीन रुग्ण 4539 – बरे झालेले 4851

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like