करोना लसीसाठी अवघ्या ३ तासांत ८० लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली :  शनिवारी १ मे पासून देशात कोविड लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यात मोठ्या संख्येने १८ ते ४४ वयोगटातील नागरिक असल्याने प्रत्येक जण लस घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. मात्र त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. काल दुपारी ४ वाजल्यापासून कोविन अँपवर ही नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु सुरुवातीच्या काही मिनिटातच सर्वर डाऊन झाल्याचा मेसेज पाहायला मिळत होता. मात्र कुठल्याही प्रकारचा सर्वर डाऊन नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट करत ४ ते ७ या कालावधीत ८० लाख लोकांनी नोंदणी केल्याचा दावा केला आहे.

. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली. याबाबत नॅशनल हेल्स ऑथेरिटीचे सीईओ आर. एस शर्मा म्हणाले की, ३ तासात ८० लाखापर्यंत लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. प्रति सेकंद ५५ हजार लोक साईटवर होते. सिस्टमने अपेक्षेनुसार काम केले. कल संध्याकाळी ४ च्या सुमारास कोविन, आरोग्य सेतू आणि उमंग अँपवरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर ७ पर्यंत ८० लाखापर्यंत लोकांनी नोंदणी केली आहे

https://www.cowin.gov.in/home यावर जाऊन “register/sign-in” पर्यायावर क्लिक करून पुढे नाव नोंदवू शकता. संध्याकाळी ४ वाजता कोविन सर्वर डाऊन झाल्याने अनेकांना अडचण झाली. कोविड सर्वर डाऊन झाल्याचे मेसेज पाहायला मिळाले. त्यानंतर काही काळातच ही वेबसाईट पुन्हा सुरू झाली.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like