करोनाचा विस्फोट! भारतात गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : भारतात करोनाने अक्षरशः थैमान घातला असून देशातील वाढणारी रुग्ण संख्या अतिशय गंभीर आहे. दम्यान  गेल्या २४ तासांत देशात तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १४ हजार ८३५ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २१०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्या नोंद झालेली नाही. भारताच्या आधी अमेरिकेत एका दिवसात तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. २ जानेवारी २०२१ ला अमेरिकेत ३ लाख ३१० रुग्ण आढळले होते.

तसेच, भारतात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like