बेटावद शिवारात मोटारसायकल अपघात

खड्डयाने घेतला तरुणाचा बळी
धुळे : रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बेटावद- अमळनेर रस्त्यावर घडली. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

अमळनेर येथील मनोज भिका शिंपी (वय 40, रा. जिजाऊ नगर) मित्र अमोल यांच्यासोबत बुधवारी (ता.16) दुपारी चारच्या सुमारास मोटारसायकलने (एमएच19/डीपी1216) नरडाणाहून अमळनेरला परतत होते. बेटावदजवळ रस्त्यावरील खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात त्यांचे नियंत्रण सुटले. मोटारसायकल घसरून मनोज शिंपी रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे उपचार करुन धुळे शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले.

शनिवारी (ता.19) रात्री साडेनऊच्या सुमारास मनोज शिंपी यांचा मृत्यू झाला. भाऊ भरत शिंपी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसात नोंद झाली. हवालदार धनगर तपास करीत आहेत.

You May Also Like