खासदार राजीव सातव यांचे करोनाने निधन; पार्थिव हिंगोलीकडे रवाना, उद्या अंत्यसंस्कार

पुणे : महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीला धक्का देणारी घटना घडली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. राजीव सातव यांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली होती, मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सातव यांची प्रकृती मध्यतंरी बिघडली होती.

 

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं जाणवत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. सातव यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांना करोना उपचारादरम्यान सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता. राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी देशभरात पसरली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होतं आहे.

काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट करुन सातव यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर, आता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजीव सातव यांचं पार्थिव थोड्यात वेळात पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचं मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी उद्या १७ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,फफ अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. यावेळी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड तसेच स्थानिक काँग्रेस नेते मोहन जोशी दीप्ती चवधरी कमल व्यवहारे ऊपस्थित होते. उद्या सोमवारी सकाळी  १० वाजता कळमनुरी या त्यांच्या गावात अंत्यसंस्कार होतील.

 

 

You May Also Like