मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

मुंबई : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.’मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा’ असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र ‘खराटा’च येत आहे हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे’ असा इशाराच उदयनराजे यांनी दिला आहे.

उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा समाजासाठी काही मागण्या सादर केल्या आहे. ‘इतर समाजाला केवळ ‘जीआर’ काढून आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे, यात शंका नाही. आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे’ अशी मागणीही उदयनराजेंनी केली.

You May Also Like