खा. सुजय विखे अडचणीत; पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेंकडून रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास सुरु

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यत करोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या आणि मृतांचा आकडा हा अतिशय भीतीदायक आहे. त्याच सोबत राज्यभरातील रुग्णांना आरोग्य सेवेच्या तुटवड्याला सामोरे जावे लागतेय. बेड, ऑक्सिजन रेमडेसीवीर इंजेक्शन अशा मुलभूत सुविधांचा सुद्धा साठा आता शिल्लक नाही.

दरम्यान, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास सोपविला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी विमानतळावरील खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी मिटके हे विमानतळावर दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या इंजेक्शन खरेदीवर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गृह विभागाच्या प्रधान सचिवांना शिर्डी विमानतळावर १० एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत आलेल्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

.

 

You May Also Like