MPSC तर्फे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा भरती जाहीर; 91 जागा रिक्त

मुंबई । महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. औषध निरीक्षक, मुख्य प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 असणार आहे.
—–या जागांसाठी भरती
औषध निरीक्षक
मुख्य प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
औषध निरीक्षक (Drug Inspector) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Pharmacy किंवा Pharmaceutical Chemistry मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
मुख्य प्रशासकीय अधिकारी
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law ,मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
तरुण प्रोफेशनल्सना Job Ready बनवण्यासाठी TCS चा Free Online Course
भरती शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रुपये
राखीव वर्गासाठी – 449/- रुपये
ही कागदपत्रे आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021

You May Also Like