श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार

जळगाव : शहरातील वादग्रस्त ठरलेल्या श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जि.प. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीत माझं नाव वगळण्यात यावे, अशी मागणी पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पाचोरा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय सावखेडा बु. ता.जि.जळगाव या शाळेच्या शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणी बाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी करणेच्या चौकशी समितीत माझी नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि मी कार्यरत असलेल्या पाचोरा गटात ४ पैकी २ विस्तार अधिकारी, १४ पैकी १२ केंद्रप्रमुख पदे रिक्त असून त्यांचे सर्व अतिरिक्त कामाचा बोझा पाहता तसेच सदर व श्रीमती ब.गो. शानभाग शाळेत माझा पाल्य असून सदर चौकशी समितीतून माझे नाव वगळावे, असे यात म्हंटले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!