धुळ्यात महावितरणच्या सहायक अभियंत्यास मारहाण

धुळे : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता लोकेश चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याची घटना महिंदळे शिवारात घडली. यामुळे मारहाण करणार्‍यांना तत्काळ अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी करीत सबोर्डीनेट इंजिनियर असोसिएशन धुळे च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.

शासनाकडून आणि महावितरण कंपनीकडून ग्राहकांचे थकीत असलेले विज बिल भरुन घेणे बाबत आदेश प्राप्त झाले आहेत. वरिष्ठ प्रशासनाने वीज देयक भरलेले नसल्यास त्यांचा विद्युत पुरवठा तत्काळ खंडित करण्याचे आदेश दिलेले आहेत. अलीकडेच पाचोरा येथिल राणे या महावितरण कर्मचार्‍यास अश्याच प्रकारे बेदम मारहाण झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला, तसेच उपकार्यकारी अभियंत यांनाही मारह्मण होऊन गंभीर दुखापत झाली आहे.

जळगाव येथील अधीक्षक अभियंता यांनाही मारहाण झाली आहे. पाचोरा येथील घटना ताजी असतांना अशी घटना धुळ्यात घडली आहे. मोरे यशवंत हिरालाल यांच्याकडे घरगुती वीजबिलाची 32060/- एवढी रक्कम थकली होती त्यामुळे थकीत वीजबिलाची रक्कम न भरल्या मुळे अभियंता लोकेश चव्हाण यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना वीज कनेक्शन कापण्यासाठी सूचना दिली होती. अभियंता लोकेश चव्हाण यांना गंभीर मारहाण केली. आरोपींना तत्काळ अटक करुन कारवाई करावी, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा सहसचिव एस. बी. गांगुर्डे , आशिश कासार, मनोज भावसार, अजय हिंद, निलेश पवार. चैतन्य बाघ, आशिश काकडे आदी अभियंत्यांनी दिला आहे.

हवालदार मोरे विरूध्द गुन्हा दाखल
वीज कंपनीचे अभियंता लोकेश संजय चव्हाण (रा. देवपूर, धुळे) कंपनीचे पथकासह थकित बिल वसुलीसाठी येथील साक्रीरोडवरील महिंदळे शिवारात गेले. तेथील कल्याणी नगरमध्ये काल वसुली करताना संशयित हवालदार राजेश यशवंत मोरे, कुणाल यशवंत मोरे (दोघे रा.कल्याणी नगर) यांनी अभियंता व कर्मचार्‍यांशी वाद घालून धक्काबुक्की केली, चव्हाण यांना मारहाणही केली, शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी दोघांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

You May Also Like