देशाला 2जी मुक्त करण्यासोबतच 5जी युक्त बनवणार – मुकेश अंबानी

मुंबई : जिओ त्वरित 5जी सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत आहे. 5जी इकोसिस्टम तयार करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवरील पार्टनर्ससोबतही काम करत आहोत. जिओ केवळ भारताला 2जी मुक्त नाही, तर 5जी युक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असं रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं. . गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची 44 वी सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण या सभेत व्हर्च्युअली सहभागी झाले होते. यावेळी अंबानी यांनी गुगलसोबत तयार करण्यात येणार्‍या जिओ फोन नेक्स्टचीही घोषणा केली.

रिलायन्स जिओबद्दल घोषणा करताना जिओ ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी डेटा कॅरिअर झाल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. तसंच सातत्यानं याबाबत चांगलं काम होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुकेश अंबानी यांनी एजीएमदरम्यान जिओ फोन नेक्स्टची घोषणा केली. अँड्रॉईडवर चालणारा हा स्मार्टफोन गुगल आणि जिओ यांनी मिळून तयार केला आहे. या वर्षी 10 सप्टेंबर रोजी हा फोन उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील सर्वात पहिली 5ॠ सेवा सुरू करण्यासाठी कंपनी तयार आहे. कंपनीनं नुकतीच मुंबईत 1ॠलिी ची यशस्वी चाचणी घेतली आहे. याशिवाय कंपनीला सरकारकडून चाचणीसाठी स्पेक्ट्रम आणि मंजुरीदेखील मिळाल्या आहेत, असं अंबानी यांनी स्पष्ट केलं.

वर्षभरात 1,500 नवे रिटेल स्टोअर्स
रिलायन्स रिटेलवर आपल्या शेअर धारकांना संबोधित करताना अंबानी यांनी गेल्या वर्षभरात रिलायन्स रिटेलनं 1,500 नवे स्टोअर्स जोडल्याचं म्हटलं. सद्यस्थितीत रिलायन्सचे देशात 12,711 रिटेल स्टोअर्स असल्याचं ते म्हणाले. आम्ही जगातील प्रमुख 10 रिटेलर्स बनण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील तीन ते पाच वर्षांत आम्ही या क्षेत्राक पाच पटीनं वाढू असंही अंबनी यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी जिओ मार्टबद्दलही भाष्य केलं.
फेसबुक आम्ही मिळून थहरीींरिि आणि गळे चरीीं ट्रायल बेसिसवर सुरू केलं आहे. गळे चरीीं मार्चच्या ग्राहकांच्या सूचनांनुसार ही सेवा अधिक चांगली बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आपल्या दूरसंचार व्यवसायाबाबत माहिती देताना अंबानी यांनी आपली कंपनी 425 दशलक्ष ग्राहकांना आपली सेवा देत असल्याचं म्हटलं. तसंच 22 पैकी 19 सर्कल्समध्ये रिलायन्स जिओचा महसूल सर्वाधिक होता, असंही ते म्हणाले.

 

You May Also Like