मुक्ताईनगर : रासायनिक खते व पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द करा मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन

मुक्ताईनगर :- खरिप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरच्या वतीने आज मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देऊन या दरवाढीचा निषेध करण्यात आला तसेच हि दरवाढ रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला
यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी प स सभापती राजेंद्र माळी, प्रदिप साळुंखे,माजी सरपंच प्रविण पाटील, बापु ससाणे, आसिफ बागवान, शिवराज पाटील,संजय कोळी, राजु कापसे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजु चौधरी, व पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी उपस्थितांनी
मोदी सरकार हाय हाय ,केंद्र सरकारचा निषेध असो, खतांची, पेट्रोल डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या
यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि
यंदाचा खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे त्यासाठी पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे
परंतु गेल्या एक वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी, आणि अवकाळी पर्जन्य, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला असल्या कारणाने झालेले उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे
यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणे यासाठी शेतकरी आर्थिक गणित जुळविण्याच्या तयारीत लागले आहेत
परंतु भाजपा शासित केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजुन संकटात सापडला आहे
पूर्वी 1185 ला मिळणारी डी ए पी ची गोणी आता 1900 रुपयाला मिळणार आहे, 10 : 26:26 च्या 50 किलो गोणीची किंमत 1175 होती तीआता 1775 ला मिळणार आहे अशाप्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने 15 ते 17 टक्के दरवाढ केली आहे
हि दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे
त्याचबरोबर आता पेरणीपुर्व मशागती सुरू असुन यासाठी ट्रॅक्टर ला डिझेल ची आवश्यकता असते केंद्र शासनाने डिझेल च्या किंमतीत प्रचंड वाढ केली असल्या कारणाने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहेत
पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे
पेट्रोल डिझेलची हि दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या खतांच्या , आणि इंधन दरवाढीचा जाहीर निषेध करतो
व शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो आपण आमची मागणी केंद्र शासनाकडे पोहचवून हि दरवाढ रद्द करण्यात यावीअन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल
असा ईशारा देण्यात आला आहे

You May Also Like