मुंबई : राष्ट्रीय मुक्त विद्यालयाची दहावीची परीक्षा रद्द

सीबीएसई, आयसीएसईपाठोपाठ नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगनेही (एनआयओएस) दहावीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी योग्य पद्धत अवलंबली जाईल व निकाल जाहीर करण्यात येईल असे एनआयओएस बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी जर त्यांच्या निकालावर समाधानी नसतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. बोर्डाकडून बारावीची परीक्षा मात्र पुढे ढकलण्यात आली आहे. 20 जूननंतर परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

You May Also Like