मुंबई : राज्यपालनियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नावांची यादी राजभवनातून हरवली असल्याची माहिती

मुंबई : राज्यपालनियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नावांची यादी राजभवनातून हरवली असल्याची माहिती मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राजभवनात भुताटकीचा वावर वाढला असून भुतांनी यादी पळवली का? असा खोचक सवाल केला होता. राजकीय वातावरण चांगलेच तापल्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. परंतु राजभवनातून गायब झालेली यादी सुरक्षित असल्याचे राजभवनातून कळते आहे. यादी गायब झाली नसून राजभवनातच आहे परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या यादीवर कधी निर्णय घेणार याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

१२ आमदारांच्या नावांच्या यादीबाबत माहिती अधिकाराच्या अंतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीचा तपशील मागितला होता. परंतु राज्यपाल सचिवालयात अशी १२ आमदारांच्या नावांची यादी नसल्याचे सांगितले होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबल माजली होती. संजय राऊत यांनी सामनातून खोचक टीका देखील केली होती. दोन दिवसांच्या टीका टीप्पणीनंतर अखेर राजभवनातून १२ आमदारांच्या नावाची फाईल सापडली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

राज्यपालांना सुपुर्द करण्यात आलेली फाईल राजभवनात सुरक्षित असल्याचे राजभवनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. १२ आमदारांची यादी हरवली नसून सुरक्षित आहे. विनाकारण गैरसमज करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने माहिती अधिकार अंतर्गत माहिती ज्या विभागाकडे माहिती मागवली होती त्या विभागाकडे आमदारांची यादी नव्हती त्यामुळे संबंधित विभागाने अशी यादी त्यांच्याकडे नसल्याचे उत्तरात सांगितले होते. असे राजभवनाती अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राजभवनात भूतांचा वावर

राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल.

You May Also Like