भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबई पोलिसांचा दणका

मुंबई पोलिसांकडून तब्बल 36 गुन्हे दाखल

मुंबई । भाजपाच्या  जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी दणका दिला आहे. केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली.  मात्र या यात्रेवर मुंबई पोलिसांनी 36 हून अधिक गुन्हे दाखल केलेत.  दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 36 ठिकाणी गुन्हे दाखल केले.

 

 

19 ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

You May Also Like