मुंबई : मुक्ताईनगर नगरपंचायतीत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

मुंबई : मुक्ताईनगर नगरपंचायतीत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत आल्याचा आनंद नाथभाऊंना पण झाला असेल, असं वक्तव्य पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीत सहा नगरसेवकांचा आज शिवसेनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. मुबंई येथील मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षा बंगल्यावर हा प्रवेश सोहळा झाला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

नुकताचं जळगाव महानगर पालिकामध्ये भाजपा नगरसेवक फुटून शिवसेनेत दाखल होऊन भाजपा सोडचिठ्ठी देऊन धक्का दिला असतांना आता मुक्ताईनगर येथील भाजपच्या नगरसेवकांनी भाजपाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जातं आहे. तर मुक्ताईनगर येथील भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत आल्याचा आनंद नाथाभाऊंना पण झाला असेल असं पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी सोबत बोलतांना म्हटलं आहे.

You May Also Like