मुंबई : दुसऱ्या लाटेने देशात मोठं थैमान घालते होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला.

मुंबई : दुसऱ्या लाटेने देशात मोठं थैमान घालते होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील जागतिक विक्रमांची दुर्दैवी नोंद भारतात झाली. फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचे तांडवच बघायला मिळाले. दरम्यान या भयावह परिस्थिती हळहळू कमी होत असून, देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आकडेवारीतून दिसत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांतील आकड्यामुळे दिलासादायक चित्र दिसत आहे. सहा आठवड्यानंतर देशात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. २४ तासांत देशात १ लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ लाख ७६ हजार ३०९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. २४ तासांत आढळून आलेले रुग्णसंख्या ही ४६ दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

मृतांच्या संख्येत घट

कोरोना रुग्णवाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येने काळजी वाढवली होती. देशात दिवसाला साडेचार हजार मृत्यू नोंदवले गेले. काही आठवडे देशात दिवसाला साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली होती. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन ४६० रुग्णांचा मृत्यू झाल्यांची नोंद झाली आहे. मात्र, मृत्यूंचा हा आकडा अजूनही चिंताजनकच आहे. देशात कोरोनाने मृत्यू होणाऱयांचा दर ११६ टक्के होता. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांपेक्षा जासत आहे. सक्रीय रुग्ण ८ टकक्यांपेक्षा कमी झाले आहेत. दरम्यान भारत सक्रीय रुग्णांच्या प्रकरणी जगात दुसऱ्या स्थानी आहे.

केंद्राकडून रेमडेसिविर पुरवठा बंद

केंद्राकडून राज्यांना होणारा विषाणूरोधक रेमडेसिविर या औषधाचा पुरवठा आता केंद्राने थांबवला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी या निर्णयाची माहिती दिली. “राज्यांकडे पुरेसा साठा असल्याने आता केंद्राकडून पुरवठ्याची गरज नाही. आता देशातही रेमडेसिविरचा पुरेसा साठा आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही राज्यांना रेमडेसिविरचा पुरवठा थांबवत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.

You May Also Like