”मुंबईकरांनी आधी लस उपलब्धतेची खात्री करूनच लसीकरणासाठी जावं”

मुंबई : देशासह राज्यात करोनाने हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना आरोग्य सेवांचा तुटवडा निर्माण झालाय.परिणामी राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा अपुरा पडत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आजही मुंबईत काही ठिकाणी लसीकरण बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली आहे. “मुंबईत ७ खासगी रुग्णालये आणि ३० सरकारी रुग्णालये आणि केंद्र अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरू आहे”, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच, लसींचा साठा टप्प्याटप्प्याने केंद्रावर दाखल होतो. त्यामुळे “लोकांनी आधी चौकशी करूनच लसीकरण केंद्रांवर गेल्यास त्यांची केंद्रावर जाऊन होणारी धावपळ टाळता येईल”, असं देखील महापौर म्हणाल्या.

तसेच पुढे त्या म्हणाल्या “आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना दाखवतोय की आपल्याकडे इतकाच साठा आहे. लोकांनी लस घेण्यासाठी जाताना आधी खात्री करुन जायला हवं. लसींचा साठा सकाळी १० वाजता येतो आणि त्यानंतर रुग्णालय, केंद्रांवर जातो. लोकं जर त्याबाबत विचारपूर करून गेले, तर त्यांची धावपळ कमी होईल. १ मे पासून आपण १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करणार आहोत. यासाठी सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लसीकरणाचा साठा जसा पोहोचेल, त्यानुसार टप्प्यांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने लसी दिल्या जातील. उपलब्ध लसींचा साठा देखील बोर्डवर दाखवला जाईल. त्यानुसार लोकांनाही कळू शकेल. अनेक ठिकाणी असं घडतंय की ३००-३५० लोकांचं लसीकरण झालं की साठा संपतो आणि मग उरलेल्या लोकांचे वाद होतात”, असं महापौरांनी यावेळी सांगितलं.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like