वनविभागाच्या निषेधार्थ ‘मुंडन’आंदोलन

धुळे : महाराष्ट्र शासनाने वनचराई समजोत्या नुसार मेंढपाळ ठेलारी समाजास मेंढी चराई रान मंजुर करण्यात केले आहे. मात्र ती वनचराई जमीन फक्त कागदावरच आहे, प्रत्यक्ष त्या जमीनी उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत. वारंवार निवेदन देवून देखील वन विभाग दखल घेत नसल्याने याचा निषेध म्हणून महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने शिवदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली धुळे वन विभाग कार्यालयासमोर श्राध्द घालून मुंडण आंदोलन करण्यात आले.

मेंढपाळ ठेलारी समाज अतिशय कष्टाचे व हलाकीचे जिवन जगत असतो कोण्याच्या देण्यात नाही किंवा घेण्यात नाही. मागील दोन वर्षा पासून करोनाने जगात हाहाकार माजवला आहे. कोणाच्या नोकर्या गेल्या, कोणाचा व्यवसाय बंद पडला. महाराष्ट्र शासनाने मेंढपाळ ठेलारी समाजास वनचराई समजोत्यात मेंढपाळ ठेलारी समाजास मेंढी चराई रान मंजुर करण्यात आले आहे ते वनचराई समजोता झाल्या पासुन आज पर्यंत ती वनचराई जमीन फक्त कागदावरच आहे.

मेंढपाळ ठेलारी समाज वर्षानुवर्षे मेंढी वनचराई जमीन दाखवण्यासाठी मेंढपाळ ठेलारी समाजाने शेकडो निवेदने दिली, मोर्चे काढले, आंदोलने केली परंतु वन कार्यालयास पर्यंत जाग येईना मग ज्या अधिकार्यांना जाग येत नाही महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाने निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देवुन ही उपवन संरक्षक कार्यालयाने कुठलीही खबरदारी न घेता आमच्या निवेदना कडे दुर्लक्ष केले, महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने श्राध्द घालुन मुंडन आंदोलन केले. आमच्या मागणीचा निर्णय त्वरित न झाल्यास दि. 15 जुलै रोजी संपूर्ण उपवन संरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल.

यावेळी मुंडण आंदोलनात मेंढपाळ ठेलारी विकास मंडळ संचलित, महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास कारंडे, विनोद खेमनर, पप्पु थोरात, भरत शिंदें, भालचंद्र लांडगे, चंद्रकला मासुळे, रोहन खेमनर,दिनेश सरक, मोतीराम गरदरे, पंकज मारनार, प्रविण खामगळ, ज्ञानेश्वर सुळे, मोहन भिवरकर, गोविंदा रुपनर, नाना पडळकर, नाना ठेलारी, समाधान ठोंबरे, पिंटु भिवरकर, रामचंद्र पडळकर आदी सहभागी झाले.

धनगर समाज युवा मल्हार  सेनेचा पाठींबा
मुंडण आंदोलनात युवा मल्हार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद खेमनर, भारत शिंदे, पप्पु थोरात, भालचंद लांडगे, रोहन खेमणार यांनी आंदोलनात सहभागी होत मुंडण करून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.  मल्हार

You May Also Like

error: Content is protected !!