साडेपाच लाखांच्या औषधांची परस्पर विक्री

वाहन चालकानेच घातला गंडा
धुळे : हरीद्वार येथून घेतलेली साडे पाच लाखांची औषधाची खोकी चालकाने परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित चालकाविरुध्द मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक शेख (वय 27, रा. तुर्तीपुर, जि. फारुकाबाद, उत्तरप्रदेश, ह.मु. बांद्रा, मुंबई) याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित चालक मतीन सिद्दीकी नसरत सिद्दीकी (रा. इसापूर, ता. कमालगंज, जि. फारुकाबाद) याच्याविरुध्द मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, संशयित मतीन याच्या ताब्यातील व्हॅनमध्ये औषधांचे खोकी भरलेली होती.  5 लाख 45 हजार 832 रुपयांची औषधी हैद्राबाद येथे पोहोचविण्यासाठी दिली होती. औषधी घेऊन चालक मतीन व्हॅनने (एमएच04/एचवाय6991) 21 जुनला निघाला. हरीद्वार येथून हैद्राबाद, बंगळुर, चेन्नई, केरळ आदी ठिकाणी पोहोचविणे आवश्यक होते. प्रवासादरम्यान चालकाने औषधांचे 72 खोकी उतरवून त्याची परस्पर विक्री करीत विल्हेवाट लावली. साडे पाच लाख रूपये औषधांची किंमत आहे. लळिंग (ता.धुळे) टोलनाक्यादरम्यान चोरीचा प्रकार उघडकीस आला.

औषधी विक्रीतून महेश कॉर्गो मोव्हर्स (बांद्रा) यांचा विश्वासघात केला. काही दिवसांपुर्वी औषधी विक्रीचा प्रकार उघडकीस आल्याचेही अब्दुल शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

You May Also Like