मुजोर वाळुमाफियांचे महसुल विभागासमोर आव्हान

भूषण नानकर । धुळे
सद्या आपल्या कानावर ऐकु येणारा प्रचलित असा शब्द म्हणजे माफिया. आणि रेती माफीया हा सद्या जिल्हाभरात स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाने आपले बस्तान मांडताना दिसतोय. परंतु हा रेती माफिया निर्माण का झाला? याचे कारण काय ? हे शोधण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही मात्र आम्ही याचे ठोस कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. यात रेतीबाबत जिल्हा प्रशासनाचे चुकीचे धोरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आत्मपरिक्षणाची गरज आहे का? वाळुबद्दलचे धोरण बदलविण्याची गरज आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होवु लागला आहे. त्यामुळे आता मुजोर वाळुमाफियांचे महसुल विभागासमोर आव्हान असल्याचे दिसुन येत आहे.

धुळे शहराच्या मध्यातुन पांझरा पात्र वाहते. शहरी भागातुन जाणार्‍या या पात्रातुन भर दिवसा सर्रासपणे वाळु वाहतुक केली जाते. महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी पांझरानदीचे पात्र ओलांडुन कार्यालयात हजेरी लावतात. जातांना पांझरा नदीतुन वाळुची होणारी चारेटी वाहतुक पाहत जातात. पंरतु, जणु डोळ्याला पट्टी बांधुन पुल पार करतात की काय असा संभ्रम नागरिकांमधे पसरला आहे. कारण डोळ्यासमोर दिसणारी अवैध वाळु वाहतुक रोखु शकत नाही. यामुळे वाळुमाफियांसमोर महसुल विभागाने गुडघे टेकले आहेत का असा प्रश्न जनतेतुन उपस्थित होवु लागला आहे. महसुल विभाग वाळुची चोरटभ वाहतुक करणार्‍यांवर कठोर कारवाई का करत नाही. यात वाळुमाफियांचे महसुल विभागातील अधिकार्‍यांचे साटेलोटे असल्याची चर्चा नागरिकांमधे रंगु लागली आहे. कोणतीही शास्ती न भरता शासनाचा महसुल बुडविणार्‍यांचे धाडस वाळुची चोरटी वाहतुक करणार्‍यांचे धाडस होतेच कसे? शासकिय अधिकारी कारवाई न करता मुग गिळून का गप्प बसतात असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

पर्यावरणाचा र्‍हास होत असतांना पांझरा पात्रातुन सर्रास दिवसाढवळ्या वाहतुक केली जाते हे दृश्य एकाही पर्यावरणा वाद्याला दिसु नये हे मोठे दुर्देव आहे. पावसाळा सुरू झाला. वृक्ष लागवडीचे पेव आता फुटेल. अनेक राजकीय व सामाजिक संस्था वृक्षारोपनाच्या कार्यक्रमात मश्गुल होतील. पर्यावरणाची चिंता वाहणार्‍यांनी पांझरा पात्राच्या होणार्‍या हाणीाबाबत कोणताही आवाज उठविला जात नसल्याने शहरासह संपुर्ण जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पांझरा पात्रातुन शेकडो टण वाळु वाहुन नेणार्‍यांवर महसुल विकासाच्या अधिकार्‍यांसमवेत मनपा आयुक्त कठोर कारवाई कधी करतील यांकडे सर्वांच्या नजरा लागुन आहेत. वाळुची चोरटी वाहतुक करणार्‍यांना महसुल विभागाकडुन अशी सुट मिळत राहिली तर पांझरेचे पात्र सांडपाणी वाहुन नेणारे ओसाड नाल्यात रूपातंर होण्यास वेळ लागणार नाही.

You May Also Like