माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला – पंकजा मुंडे

मुंबई : राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्टवरुन त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. आता या संपूर्ण विषयावर स्वत: पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला. चुकीच्या बातम्यामुळे मी व्यथित झाले. पक्षासी मी बांधील आहे. तसेच भाजप पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवण्यात आल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. मी खूप व्यथित आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपण भाजपा सोडणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

पद मिळवण्यासाठी मी दबाट टाकतेय हा आरोपही संपूर्णपणे चुकीचा आहे. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मंगळवारी भाजपाचे नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे दरवर्षी अशी पोस्ट टाकतात. पण, यावेळी त्यांच्या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर भाजपाचे अनेक बडे नेते संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन “पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,” असा खुलासा करावा लागला.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.