coronavirus : शहाद्यात करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेला युवक करोना पॉझिटिव्ह

नंदुरबार : जगभरात खळबळ उडवून देणार्‍या ‘करोना’ अर्थात कोविड १९ या विषाणूमुळे जगभरात एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे बळी आतापर्यंत घेतले आहेत. नंदुरबार शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड_१९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

नवीन बाधित रूग्ण आधी सापडलेल्या बाधित रूग्णाच्या संपर्कात आला होता अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.  नंदुरबार शहादा येथील २३ वर्षीय युवकाच्या कोविड१९ चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक त्याच प्रतिबंधीत क्षेत्रातील असून कोविड -१९ च्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या युवकाच्या संपर्कात आला होता. बाधित रूग्णावर उपचार सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातील करोना रूग्ण संख्या ८ वर पोहचली असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.