नाशिक ऑक्सिजन गळती दुर्दैवी घटना : २४ रुग्णांचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक : काल डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन प्लांटला गळती होऊन रुग्णालयातील २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

रुग्णालयात असलेल्या १३ केएल क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती लागली. ही घटना घडली त्यावेळी रुग्णालयात १५७ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३१ रुग्ण हे ऑक्सिजनवर, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ६१ रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत होते. मात्र, ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली.

दरम्यान, याप्रकरणी भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाची फिर्याद दाखल केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करीत दोषींवर कारवाइच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ७ जणांची समिती नेमून घटनेची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like