नवनीत राणांना धक्का, हायकोर्टाकडून जात प्रमाणपत्र रद्द

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच, नवनीत राणांना हायकोर्टाकडून 2 लाखांचा दंड ठोठविण्यात आला आहे.

या दरम्याण, खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल आज दिनांक 8 जून रोजी घोषीत करण्यात आला.

उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसंच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अ‍ॅड.सी.एम्.कोरडे, अ‍ॅड.प्रमोद पाटील व अ‍ॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली.

 

You May Also Like