नक्षलवादी-सुरक्षा दलात चकमक; एक नक्षलवादी ठार

सुकमा । छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त हाती येत आहे.  जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफ यांनी ही संयुक्त मोहीम हाती घेतली. त्यावेळी सुमारे दीड तास ही चकमक झाली. त्यात एक नक्षलवादी ठार झाला तर बाकीचे अनेक जण पळून गेले. पळून गेलेल्यांपैकी अनेक नक्षलवादी जखमी झाले असावेत असा कयास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तेथील शोध मोहीम अजूनही सुरूच ठेवण्यात आली आहे. काही जखमी नक्षलवादी सुरक्षा जवानांच्या हाती लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

 

 

You May Also Like