राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची ईडी कार्यालयात काल तब्बल ९ तास चौकशी झाली

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची ईडी कार्यालयात काल तब्बल ९ तास चौकशी झाली. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. आता खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या भोसरी येथील भूखंड खरेदी केला होता. या पार्श्वभूमीवर ईडीचे समन्स बजावण्यात आले आहे. यावर मंदाताई खडसे यांनी मुदत मागून घेतली आहे. यामुळे त्यांची लागलीच चौकशी होण्याची शक्यता तशी कमी आहे.

खडसेंची ईडीकडून ९ तास चौकशी

दरम्यान, एकनाथराव खडसे गुरुवारी (८ जुलै) सकाळी ११ वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ९ तासांच्या चौकशीनंतर रात्री आठच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर पडले. यावेळी एकनाथराव खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणं टाळलं. चौकशी झाल्यावर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या गाडीत बसून रवाना झाले. त्यांच्या वकिलांनी माध्यमांना या चौकशीची माहिती दिली. यावेळी वकिलांनी ईडी चौकशीसाठी जितक्या वेळा बोलावेल तितक्या वेळा हजर राहण्याचं खडसेंनी आश्वासन दिल्याचं सांगितलं.

You May Also Like

error: Content is protected !!