नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी संग्रहालयातून हरवली?

मुंबई : 26 जानेवारी रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनलानंतर आणि करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर लाल किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. त्यावेळी संग्रहालयात पर्यटकांना बर्याच रिकाम्या पेट्या दिसल्या. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. लाल किल्ल्यातील नेताजींना समर्पित संग्रहालयाच्या उद्घाटनावेळी ही टोपी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली होती.

स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांची टोपी लाल किल्ल्यातील संग्रहालयातून हरवल्याचा दावा त्यांच्या पुतण्याने रविवारी केला होता. त्यावर आता सांस्कृतिक मंत्रालयाने माहिती दिली आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यातील नेताजींना समर्पित संग्रहालयाच्या उद्घाटनावेळी ही टोपी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली होती अशी माहिती नेताजींचे पुतणे चंद्र कुमार बोस यांनी दिली होती.

बोस परिवाराने नेताजींची ऐतिहासिक टोपी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोंदीकडे दिली होती. नरेंद्र मोदीजी ती टोपी लाल किल्ल्यातील संग्रहालयात ठेवण्यात यावी आणि दुसरीकडे हलवली जाऊ नये. नरेंद्र मोदींना विनंती आहे की त्यांनी टोपी मूळ ठिकाणी लावण्याची सूचना करावी, असे त्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावार याबाबत चर्चा सुरु झाली होती.

सांस्कृतिक मंत्रालयाचे स्पष्टीकरण
चंद्र कुमार बोस यांच्या ट्विटनंतर संस्कृती व पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी आणि त्यांची तलवार पूर्णपणे सुरक्षित आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नेताजींशी संबंधित 24 वस्तू व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकाता येथे कर्जावर दिली आहेत. या वस्तू नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी देण्यात आल्या होत्या. लवकरच त्या परत आणल्या जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

You May Also Like