नवी दिल्ली : एक दिवसाच्या खंडानंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत अनुक्रमे २३ पैसे आणि २५ पैसे वाढ झाली

नवी दिल्ली : एक दिवसाच्या खंडानंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत अनुक्रमे २३ पैसे आणि २५ पैसे वाढ झाली. या दरवाढीनंतर दाेन्ही इंधनांचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले. मुंबई आणि जयपूरमध्ये डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे.

या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९३.४४ रुपये लिटर, तर डिझेल ८४.३२ रुपये लिटर झाले. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ९९.७१ रुपये लिटर, तर डिझेल ९१.५७ रुपये लिटर झाले. या महिन्यात इंधनाचे दर १३ वेळा वाढले आहेत. त्यात पेट्रोल लिटरमागे ३.०४ रुपयांनी, तर डिझेल लिटरमागे ३.५९ रुपयांनी महाग झाले. राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल आधीच शंभरीपार गेले आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही पेट्रोल शंभरी पार गेले असून, हा विक्रम करणारी ती पहिली राजधानी आहे.

देशातील काही प्रमुख शहरांतील इंधन दर
शहर पेट्रोल डिझेल
नवी दिल्ली ९३.४४ ८४.३२
मुंबई ९९.७१ ९१.५७
कोलकाता ९३.४९ ८७.१६
चेन्नई ९५.०६ ८९.११
बंगळुरू ९६.५५ ८९.३९
हैदराबाद ९७.१२ ९१.९२
भोपाळ १०१.५२ ९२.७७
जयपूर ९९.९२ ९३.०५

You May Also Like