नवी दिल्ली: LPG सिलेंडरच्या बुकिंगबद्दल लवकरच नवा नियम येणार आहे.

नवी दिल्ली : सिलेंडरच्या बुकिंगबद्दल लवकरच नवा नियम येणार आहे. आता आपल्याला फक्त आपल्याच गॅस एजन्सीकडून  गॅस बुक करण्याची गरज नाही, तर इतर एजन्सीकडूनही आपण बुकिंग करू शकाल. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून काही नवे नियम लागू झाले होते ज्यात सिलेंडरचे बुकिंग ओटीपीद्वारे करण्यात आले होते जेणेकरून बुकिंगची यंत्रणा अधिक सुरक्षित आणि चांगली होईल. आता पुन्हा एकदा एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरीची यंत्रणा सुलभ करण्याची तयारी केली जात आहे.

एलपीजी बुकिंगचे नियम बदलण्याची तयारी

सरकार आणि तेल कंपन्या यार विचार करत आहेत की ग्राहकांसाठी बुकिंग आणि रीफिलची पूर्ण प्रक्रिया कशी सोपी आणि वेगवान करता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी जेव्हा एलपीजीच्या नव्या नियमांबद्दल चर्चा सुरू होती तेव्हा यावरही विचार केला गेला होता की एलपीजी रीफिलसाठी ग्राहकांना फक्त एकाच एजन्सीवर अवलंबून राहावे लागू नये. त्यांच्या नजिकच्या इतर एजन्सीकडूनही त्यांना सिलेंडर रीफिल करता यावा. यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एक इंटिग्रेटेड मंच तयार करतील.

कोणत्याही एजन्सीकडून करता येणार एलपीजी रीफिल?

अनेकदा ग्राहकांना आपल्याच एजन्सीकडे बुकिंग केल्यानंतर रीफिलसाठी बराच काळ वाट पाहावी लागते, कारण ही एजन्सी त्यांच्यापासून दूर अंतरावर असते जिथून डिलिव्हरी होण्यास वेळ लागतो. आता यावर विचार चालू आहे की ग्राहकांना कोणत्याही गॅस एजन्सीकडून रीफिल करून घेता येईल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्या मिळून एक खास मंच तयार करत आहेत. सरकारने तेल कंपन्यांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

पत्त्याच्या पुराव्याविना मिळणार एलपीजी सिलेंडर

याशिवाय आपल्याला आता 5 किलोचा छोटू सिलेंडर निवासाचा पुरावा न देताही मिळणार आहे. जे लोक प्रवासात असतात त्यांना या सिलेंडरचा फायदा होतो. त्यांना निवासाचा पुरावा देताना अडचणी येतात. त्यांच्यासाठी ही नवी व्यवस्था फायदेशीर ठरणार आहे. हा छोटा सिलेंडर देशभरात कोणत्याही ठिकाणी रीफिल करता येणार आहे. याचा अर्थ आपण पेट्रोल पंपावरूनही हा सिलेंडर रीफिल करू शकता.

You May Also Like