नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेमध्ये लहान बालकांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोनामुळे एका मुलाचं फुफ्फुस हे 90 टक्के खराब झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र या मुलाचा करोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांनाच धक्का बसला आहे.

बिहारमधील पाटणात हा प्रकार घडला असून मुलावर सध्या पाटणाच्या IGIMS रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलाचे वय ८ वर्ष असून त्याचे 90% फुफ्फुस खराब झाले आहे. किडनी आणि लिव्हरही संक्रमित झाले आहे. पण त्याची करोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. यामुलाची आरटी-पीसीआर टेस्ट केली, अँटिजेन टेस्ट केली. पण दोन्ही टेस्टमध्ये करोनाचे निदान झाले नाही. दोन्ही टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सिटी स्कॅनमध्ये त्याच्या कोरोनाचे निदान झाले असून, सिटी स्कॅनचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला आहे.

IGIMS अधीक्षक डॉ. मनीष मंडल यांनी याविषयी माहिती दिले ते म्हणाले की, 22 मे रोजी या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यास ताप, खोकला होता. तसेच श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्याची अवस्था पाहू त्याला तात्काळ आपत्कालीन परिस्थितीत दाखल करण्यात आले. त्याच्या काही चााचण्या करण्यात आला. ज्यामध्येच त्याचे फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरला गंभीर इन्फेक्शन झाल्याचे दिसले. मुलाच्या जीवाला धोका होता. सिटी स्कॅनमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत होते.

या मुलाला अँटिबायोटिक्स, रेमडेसिवीर आणि एस्टेरॉइजसह नेब्युलाइझेशन देण्यात आले. दर मिनिटाला 16 लीटर ऑक्सिजन देण्यात आला. त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांची टीम दाखल होती. अखेर सुदैवाने डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरले. मुलाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. मुलाची बिघडत चाललेली प्रकृती स्थिर झाली. या मुलाची प्रकृती आधीपेक्षा बरीच सुधारली असून तो स्वतःहून जेवू शकतो अशी माहिती डॉ. मंडल यांनी दिली आहे.

You May Also Like