नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळं देशात सर्वत्र बिकट स्थिती निर्माण झाली आहे

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळं देशात सर्वत्र बिकट स्थिती निर्माण झाली आहे. आता कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असली तर मृत्यूदर आणि ब्लॅक फंगसमुळे (काळी बुरशी) चिंता वाढली आहे. काळी बुरशी, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचे देखील रुग्ण आढळून येवू लागले आहेत. त्यापैकी काळी बुरशीचे रुग्ण सर्वाधिक आहेत. दरम्यान, आयसीएमआरने एका अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेले जवळपास 3.6 टक्के रुग्ण सेकंडरी बॅक्टिरीयल आणि फंगल इन्फेक्शनग्रस्त आहेत. आयसीएमआरने हा अहवाल सोमवारी प्रकाशित केला.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार आयसीएमआरने ताजा अहवाल सोमवारी प्रकाशित केला त्यात दुसऱ्या लाटेत सेकंडरी इन्फेक्शनमुळे बहुतांश मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून दिसून येत आहे की, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये सेकंडरी बॅक्टिरीयल रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढून 56.7 टक्के झाले आहे. तर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण 10.6 टक्के आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा सेकंडरी बॅक्टिरीयलमुळे मृत्यूदर 78.9 टक्क्यांपर्यंत वाढला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये म्यूकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली त्याला स्टेरॉईडचाही संबंध आहे. स्टेरॉईडचा अती मारा केल्यामुळे या प्रकारचे रुग्ण वाढले आहेत. दुसरी लाट ज्यावेळी देशात थैमान घालत होती. त्यावेळी बाजारातून ही स्टेरॉईड औषध गायब झाली होती. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते. ज्यादा शक्तिशाली औषधांचा रुग्णांवर मारा करणे घातक ठरू शकते याविषयी इशारा देण्यात आला आहे, असे सर गंगा राम रुग्णालयाच्या सूक्ष्म जीव विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. चंद वट्टल यांनी सांगितले.

You May Also Like