नवी दिल्ल्ली – करोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला भारतात सुरुवात झाली आहे

नवी दिल्ल्ली – करोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला भारतात सुरुवात झाली आहे. पण लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यावर आता उपाय म्हणून सरकारच्या वतीने लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मात्र लसीबाबत अजूनही नागरिकांन मध्ये गैरेसमज आणि लसीबाबत अनेक शंका दिसून येतेकाही ठिकाणी नागरिकांना अफवेमुळे लस घेण्यास नकार दिलाय. उत्तर प्रदेशमध्ये लसीकऱणापासून बचाव कऱण्यासाठी नदीत उड्या मारल्याची घटना ताजी असतानाच मध्यप्रदेशमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील मालीखेडी गावात गावकऱ्यांनी थेट लसीकरणाला नकार देत लसीकरण पथकावरच हल्ला केला आहे. गावकऱ्यांनी केलेल्या या हल्यात तहसीलदार आणि लसीकरण पथकातील कर्मचारी आपला जीव वाचवत पळाले. पोलिसांनी या प्रकणात तीन आरोपींना अटक केली आहे. 50हून आधिकच्या जमावानं हल्ला केल्याचं आधिकाऱ्यानं सांगितलं. चार जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

You May Also Like

error: Content is protected !!