ब्लॅक फंगसचा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून नव्या सूचना जारी

नवी दिल्ली : देशात आलेली करोनाची दुसरी लाट कमी होत असून . करोनाचे रुग्ण कमी होत असताना ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत आहेत. मात्र करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगसची (म्युकोरमायकोसिस) लागण होत असल्याचे  दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने  करोना उपचारांमध्ये नवीन सूचनांचा समावेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या सूचनांचा करोना उपचार नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्लॅक फंगसचा वाढता धोका लक्षात घेता कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्सचा काळजीपूर्वक वापर करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला.

करोना रुग्णाच्या उपचारादरम्यान स्टेरॉईड्सचा वापर केला जातो. स्टेरॉईड्स ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. स्टेरॉईड्समुळे ब्लॅक फंगसची लागण होण्यास कारणीभूत असल्याचे संशोधनातून समोर आले  आहे. त्यामुळे करोना रुग्णांवर उपचार करताना वापरायच्या औषधांबद्दल आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘करोनाचा विषाणू हवेतून पसरू शकतो. करोना रुग्णांवर उपचार करताना स्टेरॉईड्स, रेमडेसिविर आणि टोसिलिजुमॅब औषधांचा योग्यपणे वापर करण्यात यावा. करोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर कोणतेही विपरित परिणाम होऊ नये, गुंतागुंत निर्माण होऊ नये या गोष्टी विचारात घेऊन औषधांचा काळजीपूर्वक वापर करण्यात यावा,’ अशा सूचना  केंद्र सरकारकडून दिल्या गेल्या आहेत.

 

You May Also Like