राम नवमी साजरी करण्यासाठी सरकारकडून नवी नियमावली

मुंबई :देशासह राज्यभरात करोनाने रौद्र रुप धारण केलेय.  रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा साखळी लवकरात लवकर तोडण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. हि साखळी तोडण्याकरता सामाजिक अंतर पाळणे, आणि गर्दी टालने हा उपाय आहे. दरम्यान मागील वर्षी पासून पप्रत्येक सण हा गर्दी न करता साजरा करण्यात यावे. असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. या वर्षी देखील करोना स्थिती अधिकच गंभीर आहे, म्हणून या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लादण्यात आलेले असतानाच आता श्रीरामनवमीसाठीही  नवी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे. दरम्यान, रामनवमी उत्सव साजरा करताना सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

असे आहेत नियम

1. श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी हा उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

2. दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजेसाठी जाता येणार नाही. तसंच मंदिरात भजन, किर्तन किंवा इतर कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.

3. मंदिराचे व्यवस्थापक/ विश्वस्त यांनी शक्य असेल तर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी

4. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

5. कोव्हिड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या इतर निर्बंधांचे काटेकोर पालन करावे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like