शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले नाशिक शहरातील रस्ते

नाशिक : शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले नाशिक शहरातील रस्ते, गॅस पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेत. पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीतून यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप लोकप्रतिनधींनी केलाय.तर ऐन पावसाळ्यात चांगले चुंगले रस्ते खोदल्याने नाशिककरांचा दररोजच प्रवास चिखलयम झालाय. महापालिका आयुक्तांनी मात्र प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

अवघ्या वर्षभरापूर्वी नाशिक शहरात तब्बल एक ते दोन हजार कोटी रुपये खर्च करत अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, पालिकेचे हे रस्ते गॅस पाईप लाईनच्या नावाखाली खोदले गेली. विशेष म्हणजे हे खोदलेले रस्ते पावसाळा सुरू होऊनही दुरुस्त न करण्यात आल्याने पाऊस पडला की चिखलयमय होत आहेत.शहरातील सातपूर, सिडको,पंचवटी,नाशिक रोड अशा सर्वच भागातील रस्त्यांची गॅस पाईप लाईनच्या ठेकेदाराने पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत नासाडी केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

महापालिकेचं आर्थिक नुकसान केल्याचा आरोप

शहरातील सामन्य नागरिकांना नळ कनेक्शन अथवा इतर कामासाठी रस्ता खोदायचा ठरला तर तीन ते साडेतीन फुटासाठी 5 हजार रुपये इतका दर आकारला जातो मात्र या ठेकेदाराला केवळ 2 ते 3 हजार रुपये इतका दर आकारत अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंधातून मेहरबाणी दाखवत पालिकेच आर्थिक नुकसान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 205 किलोमीटरच्या रस्ते खुदाई साठी या ठेकदाराकडून नियमांनुसार 160 ते 170 कोटी रुपयांची नुकसान भरपाई घेणं अपेक्षित असताना पालिकेने केवळ 78 कोटी रुपयांची भरपाई घेतल्याने पालिकेच अधिकाऱ्यांच्या चिरी मिरी साठी तब्बल 80 ते 90 कोटींच नुकसान झाल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

You May Also Like