नायजेरीयन नागरिकांकडुन मुंबईत 50 लाखांचे ड्रग्ज जप्त, तिघांना अटक

मुंबई : एनसीबीच्या मुंबई विभागाने मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असुन तब्बल 50 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर अनोख्या पद्धतीनं ही टोळी अंमली पदार्थांची तस्करी करत होती. हार्डवेअर पार्टबरोबर या अंमली पदार्थांची तस्करी केली जात होती. कोरोनासंकटामुळं विमान प्रवास शक्य नसला तरी शक्कल लावून ही टोळी तस्करी करत होती.

एकाच वेळी विविध हार्डवेअर पार्ट मध्ये लाखो रुपयांचे अमली पदार्थ सोप्या मार्गे आखाती देशात तस्करी करून पाठवले जायचे. या सर्व रॅकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार समीर वानखेडे यांनी पाळत ठेवण्याकरता एका विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाला तस्करीची हालचाल लक्षात येताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं नायजेरियन नागरिकासह तिघांना ताब्यात घेतलं. त्यांनी चौकशीत अनेक आखाती देशांत कोट्यावधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचं कबूल केलं आहे.

दरम्याण, एका नायजेरियन नागरिकानं मीरा रोडमधून अंमली पदार्थाचे पॅकेट तयार केले होते. यारा कॅट मार्फत कोट्यावधी रुपयांचे हे अंमली पदार्थ आखाती देशात कतारला पाठवले जाणार होते. मुंबईतील एक खाजगी व्यक्ती त्याचबरोबरीने मीरा रोड येथील एक कुरिअर कंपनी काम करणारा व्यक्ती यांची टोळी या नायजेरियन नागरिकानं तयार केली होती. या कुरियर कंपनीमार्फत विविध हार्डवेअर किंवा अनेक वस्तू आखाती देशात पाठवल्या जातात. त्यांचा फायदा घेऊन हार्डवेअर पार्ट मध्ये तब्बल आठ पॅकेट मधून 2221 अमली पदार्थ भरलेल्या कॅप्सूल पाठवण्यात येत होत्या. हार्डवेअर पार्टमधील पोकळीत लपून त्याची तस्करी केली जात होती.

You May Also Like