ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हरही मिळेना,एसटीचे ड्रायव्हर आणणार टँकर

मुंबई: सध्या देशात करोनाची स्थिती अतिशय गंभीर झाले. वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेड,आणि  ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालाय. दरम्यान,  बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे.

याबद्दलची माहिती अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.

तसच, आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असं ते म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता, असं ते म्हणाले. तसेच ब्रुक फार्मावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचं नाही, असं ते म्हणाले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like