बूस्टर डोस घेण्यासाठी आता 9 महिने थांबण्याची गरज नाही

मुंबई : देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बूस्टर डोस देण्यात येत आहे. यातच आता बूस्टर डोस घेण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लवकरच बूस्टर डोस निर्धारित केलेल्या कालावधीच्या अगोदर म्हणजेच ६ महिन्यात नागरिकांना घेता येणार आहे. सध्या बूस्टर डोस घेण्याचा कालावधी 9 महिने आहे. मात्र काल राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्यात आले असल्याने आता 6 महिन्यात बुस्टर डोस घेता येणार आहे. या आधी बुस्टरडोस घेण्यासाठी 9 महिन्यांचं अंतर निश्चित करण्यात आले होते. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयात शिफारस केली जाणार असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

राष्ट्रीय सल्लागार समितीच्या पार पडलेल्या बैठकीत, बुस्टर डोसमधील अंतर 6 महिने करण्यावर सहमती दर्शवली आहे बूस्टर डोससंदर्भात केलेल्या एका अभ्यासावर चर्चा करण्यात आली. वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांचाही आढावा घेतला. 18 वर्षांवरील सर्वाना ज्यांचा कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, अशा व्यक्ती बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत. केंद्र सरकारने गेल्या महिन्यात परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्या संबंधित देशाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 9 महिन्यांच्या कालावधीपूर्वी बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

You May Also Like